Shree Swami Samarth Punyatithi HD Images: श्री स्वामी समर्थ महाराज यांना भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार मानले जाते. चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. तर चैत्र वद्य तृतीयेला स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. आज त्यांची पुण्यतिथी आहे. स्वामी समर्थ महाराजांचे भारतभर लाखो भक्त आहेत. त्यांच्या शिष्यांनी विविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना केली आहे. स्वामी मंदिरे, सेवा केंद्रे देखील स्थापन झाली आहेत. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मठांमध्ये भक्तांची मोठी गर्दी होते. मंत्रपठण, नामपाठ असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे सारं काही बंद असणार आहे. त्यामुळे घरच्या घरी किंवा मनोमनी स्वामी समर्थांचे चिंतन करुन त्यांना अभिवादन करावे लागणार आहे.
स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी HD Images, Wallpapers सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर महाराजांना करा कोटी कोटी प्रणाम!
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त संदेश:
भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!
अशक्य ही शक्य करतील स्वामी |
श्री स्वामी समर्थ | जय जय स्वामी समर्थ ।
श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!
श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले, अशी देखील धारणा आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी ही स्वामी समर्थांची वचने अत्यंत आश्वासक असून सकारात्मकता बहाल करतात. यामुळेच लाखो भक्त महाराजांसोबत जोडले गेले.