Shree Swami Samarth Punyatithi 2020: स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन  करणारे मराठी HD Images आणि Whatsapp Status
Shree Swami Samarth Punyatithi 2020

Swami Samarth Punyatithi 2020 Images:  भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची (Shree Swami Samarth)ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला मियमित मोठी गर्दी असते. यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात. पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट (Akkalkot) येथील 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार आज, 20 एप्रिल दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी (Swami Samarth Punyatithi) असल्याने त्यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस खास आहे. दरवर्षी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त नामजपासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. पण सोशल मीडियामध्ये आज फेसबूक (Facebook), व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) माध्यमातून स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या भक्तांसोबत खास मेसेज (Messages), स्वामी समर्थांचे संदेश, स्वामींचे फोटो (Swami Samarth Photos) शेअर करयचे असतील तर 'लेटेस्टली' कडून तयार करण्यात आलेले हे काही खास इमेजेस तुम्हीच नक्कीच शेअर करू शकता. यंदा प्रत्यक्ष मठामध्ये, देवळामध्ये जाऊन स्वामींच्या पुण्यतिथीचा सोहळा साजरा करणं शक्य नसल्याने तुम्ही डिजिटल माध्यमातून स्वामींचं नामस्मरण करू शकता. अक्कलकोट स्वामी महाराजांचं स्मरण करण्यासाठी जपमंत्र ते नाव स्वामींचे येता माझा ठाई रे ... ही भक्तीमय गाणी देतील सकारात्मक उर्जा!

स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त खास संदेश

Shree Swami Samarth Punyatithi 2020

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. - स्वामी समर्थ

Shree Swami Samarth Punyatithi 2020

श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त  
कोटी कोटी प्रणाम!
Shree Swami Samarth Punyatithi 2020

ॐ नमो श्री भगवते  स्वामी समर्थाय नम: ।

Shree Swami Samarth Punyatithi 2020श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथी निमित्त

विनम्र अभिवादन  

Shree Swami Samarth Punyatithi 2020

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।

सुमारे 19 व्या शतकामध्ये स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी हे महाराष्ट्रात वास्तव्याला आले होते. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. अशी देखील धारणा आहे.

Swami Samarth Punyatithi 2020 : श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल जाणून घ्या खास गोष्टी - Watch Video 

सुमारे 1856 मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि 22 वर्ष तेथे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. आजही अक्कलकोटला भेट देण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात.