Shravana Putrada Ekadashi Importance and significance: श्रावण महिन्यात सणांप्रमाणे या महिन्यात येणा-या एकादशीला तितकेच महत्व आहे. श्रावणात शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे श्रावण पुत्रदा एकादशी. संतती प्राप्तीची इच्छा असणा-यांनी हे व्रत करावे असे पुराणात सांगितले आहे. एखादी गोष्ट जेव्हा पुराणात सांगितलेली असते तर त्यामागे नक्कीच काही तरी पौराणिक कथा असते. तसेच काहीसे पुत्रदा एकादशी बाबतही आहे. यंदा 11 ऑगस्ट रोजी या एकादशी चा पारणा शुभमुहूर्त सकाळी 05:48 पासून 08:27 पर्यंत असेल. जाणून श्रावण पुत्रदा एकादशी करण्यामागची कथा आणि कसे करावे हे व्रत...
का करतात हे व्रत आणि त्या मागची कथा:
पुराणकाळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतीप्रिय, धर्मप्रिय असा एक राजा था. मात्र त्याला स्वत:च मूल नव्हतं. मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता, त्यांनी सांगितले की, मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी, निर्दयी असा राजा होता. मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एक जलाशयाजवळ पोहोचला. तेव्हा तिथे नुकतीच बाळंतिण झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती. मात्र राजाने तिला तेथून हटकले. त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे तो याजन्मी पिता बनू शकणार नाही. त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर, तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल. तरच त्यांनी संततीप्राप्ती होईल. या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार, प्रजासह राजानेसुद्धा हे व्रत केले. त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला. तेव्हापासून एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते.
कसे करावे हे व्रत:
या वेळेत सकाळी सुर्योदयापूर्वी उठून अंघोळ करणे. नंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर तूपाचा दिवा लावावा. संततीप्राप्तीसाठी हे व्रत करणा-यांनी उपवास करणे. संध्याकाळी पूजा झाल्यानंतरच हे व्रत सोडावे. हे व्रत फळ खाऊनच सोडणे. या दिवशी भात वर्ज्य करावे.
एकादशी दिवशी रात्री जागरण करण्याचे विशेष महत्व आहे. शक्य असल्यास रात्री जागून भजन-किर्तन करणे. एकादशी दिवशी विष्णुसहस्त्रनामाचे पठन करणे. दुस-या दिवशी ब्राह्मणांना जेवण वाढून त्यानंतर स्वत: अन्नग्रहण करणे.
हे व्रत पूर्ण श्रद्धेने केल्यास संततीप्राप्ती होते असे पुराणात म्हटले आहे. तसेच श्रावण पुत्रदा एकादशीचे पठन केल्याने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो.