Narali Purnima (Photo Credits: Twitter)

Shravani Purnima 2019 celebration in Maharashtra: आज श्रावणी पौर्णिमा (Shravan Purnima) म्हणजेच नारळी पौर्णिमेचा (Narali Purnima) सण आहे. प्रामुख्याने कोळी बांधवांसाठी खास असलेला हा सण समुद्रकिनारी राहणारे बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पण हिंदू धर्मीयांसाठी खास असलेला हा श्रावण महिना व्रत वैकल्यांनी भरलेला असल्याने आजची श्रावणी पौर्णिमादेखील तितकीच खास आहे. आज महाराष्ट्रात आणि देशभरात श्रावण पौर्णिमेदिवशी प्रत्येक जण त्यांच्या प्रथेनुसार विविध सण साजरे करतात. मग पहा आज भारत देशामध्ये श्रावण पौर्णिमेचं औचित्य साधून कोण-कोणते सण साजरे केले जाणार आहेत. यंदा  पौर्णिमा 14 ऑगस्ट दिवशी 15:47 ते 15 ऑगस्ट दिवशी 17:59 पर्यंत आहे.

  • नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमेदिवशी कोळी समाज पारंपारिक वेषभूषेत समुद्रावर येतात. यशाशक्ती नारळ, सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करून त्याला शांत राहण्याचे आवाहन करतात. या दिवसापासून पुन्हा कोळी बांधव समुद्रात होड्या घेऊन जातात. तसेच समुद्रावर खास कोळी नृत्यांचा कार्यक्रम होतो. सोबतच कोळीवाड्यामध्ये नारळ फोडीचा साहसी खेळ रंगतो. Narali Purnima 2019 Wishes: नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरी करा श्रावणी पौर्णिमा

  • श्रावण पौर्णिमेदिवशी जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे.
  • पोवती पौर्णिमा

श्रावण पौर्णिमा ही पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या दिवशी सुताची पोवती करून भगावान विष्णू, शिव, सूर्य यांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात.यानंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू करण्याची प्रथा आहे.

  • राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमा हा दिवस देखील अनेकदा श्रावणी पौर्णिमेदिवशी येतो. देव दानवांच्या युद्धात देवांच्या संरक्षणासाठी आणि विजयासाठी एक धागा बांधला गेला त्याच्यानंतर दुसर्‍याच दिवशी देवांचा विजय झाला त्यामुळे हा दिवस राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो अशी अख्यायिका आहे. यंदा राखी पौर्णिमा 15 ऑगस्ट दिवशी आहे.

  • संस्कृत दिन

श्रावण पौर्णिमा हा दिवस संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. प्राचीन काळी गुरूकुल पद्धतीमध्ये श्रावणी पौर्णिमेपासून नव्या अध्ययनाला सुरूवात केली जात असे.

  • श्रावण उपकर्म 

महाराष्ट्रात ब्राम्हण श्रावण पौर्णिमेदिवशी श्रावण उपकर्म  साजरी करतात. यादिवशी उपवास केले जातात. धान्यांचा आहार टाळतात. फलाहार घेत आज केवळ नारळापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. Narali Purnima 2019 Recipes: नारळी पौर्णिमेच्या निमित्त नारळी भात, वड्या व खोबऱ्या पासून बनणाऱ्या 'या' झटपट रेसिपीज नक्की करून पहा (Watch Video)

महाराष्ट्रात यंदा श्रावण महिना 2 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान आहे. या महिन्याभरात सणांची रेलचेल असल्याने सर्वत्र मांगल्यांचं, आनंदाचं वातावरण असतं. हे हिंदू धर्मीयांसाठी असलेले पवित्र पर्व तुमच्या आयुष्यातही सुख, शांती, समृद्धी घेऊन येवो याच आमच्या शुभेच्छा