Shravan Masarambh 2022 Images: श्रावण महिन्याच्या शुभेच्छा WhatsApp Status, Greetings द्वारा शेअर करून द्या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा
Happy Shravan | File Image

आषाढीची वारी झाली की सार्‍यांनाच वेध लागतात ते श्रावण महिन्याचे! श्रावण महिना (Shravan Maas) आला की त्याच्यासोबत उत्साह, चैतन्य येतोच कारण वातावरणात जसा ऊन पावसाचा खेळ सुरू असतो तसाच या महिन्यात येणार्‍या सण, समारंभांनी, व्रत-वैकल्यांनी भरलेल्या या महिन्यात प्रत्येक दिवस खास असतो. यंदा 29 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. या मंगलमय पर्वाची सुरूवात तुमच्या प्रियजणांना सोशल मीडीयात मराठमोळे संदेश, Wishes, Images, Quotes, Wallpapers, Greetings शेअर करत करू शकता. त्यासाठी तुम्ही लेटेस्टली मराठीकडून तयार करण्यात आलेली ही इमेजेस डाऊनलोड करू शकता.

यंदा महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याची सुरूवात शुक्रवार 29 जुलैपासून होणार आहे तर सांगता शनिवार 27 ॲागस्ट 2022 दिवशी आहे. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिन्यांपैकी आहे. त्यामुळे या महिन्याचं एक विलक्षण कौतुक देखील आहे. हे देखील नक्की वाचा: Shravan Month 2022 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 29 जुलै पासून; श्रावणी सोमवार व्रत, मंगळागौर सह या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या जाणून घ्या तारखा .

श्रावण महिन्याच्या शुभेच्छा

Happy Shravan | File Image
Happy Shravan | File Image
Happy Shravan | File Image
Happy Shravan | File Image
Happy Shravan | File Image

श्रावण महिन्यात नागपंचमी हा पहिला सण साजरा केला जातो. त्याच्या पाठोपाठ रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, बैलपोळा हे सण साजरे केले जातात. यांच्या जोडीला अनेक व्रत-वैकल्यं असतात. काही घरात या पवित्र महिन्यात घरात सुख शांती नांदावी म्हणून पूजा आयोजित केली जाते. महिला वर्गाला साजश्रृंगार करून या महिन्यात आपली हौस मौज पूर्ण करण्यासाठी अनेक संधी असतात.