Shivrajyabhishek Din Tithi Marathi Images: छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din Tithi) सोहळा 6 जून या दिवशीच पार पडला. परंतू, काही लोक हा दिवस तिथीनुसार साजरा करतात. यंदाचा तिथीनुसार येणारा शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek Tithi 2021) 23 जून या दिवशी येतो आहे. शिवराज्याभिषेक दिनापासून शिवशक सुरु होते. तिथीनुसार हा दिवस साजरा करणाऱ्या नागरिकांचे शिवशक आजपासून शिवशक सुरु होईल. यंदाचे शिवशक हे 348 वे असणार आहे. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एकेकांना शुभेच्छा देण्यासाठी इथे काही HD Images, Wallpapers, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) आदींसाठी देत आहोत. ज्या इथून डाऊनलोड करुन आपण वापरु शकता.
छक्षपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. परंतू, मोठ्या कष्टातून स्वराज्य स्थापन करुनही काही सनातनी लोक आणि आजूबाजूचे राजेही त्यांना राजा मानत नसत. शिवराज्याभिषेक झाल्याखेरीच राजा न मानन्याची तेव्हा पद्धत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिवरायांनी शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला. हा सोहळा रायगड येथे 6 जून 1674 रोजी पार पडला. हा सोहळा पार पडल्यानंतर शिवशक सुरु झाले आणि शिवरायांना राजा म्हणून मान्यताही मिळाली. (हेही वाचा, Shivrajyabhishek Tithi 2021 Wishes: शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार मराठी स्टेटस, Messages, Images च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!)
Shivrajyabhishek Tithi 2021 Images:
Shivrajyabhishek Tithi 2021 Images:
Shivrajyabhishek Tithi 2021 Images:
Shivrajyabhishek Tithi 2021 Images:
शौर्य, चिकाटी, धाडस, व्यवस्थापन, अर्थकारण, समाजकारण, जनहिताच्या दृष्टीने राजकारण, स्वसंरक्षण आणि आत्मबल यांसह अनेक गुणांनी संप्पन्न असे शिरायांचे व्यक्तीमत्व होते. याशिवाय अनेक भाषा, कला आणि शास्त्रही त्यांना अवगत होती, असे अभ्यासक सांगतात. शिवरायांच्या कलागुणांचे, व्यक्तीमत्वांचे, विचारांचे विविध पैलू सदासर्वकाळ नागरिकांना उपयोगी पडतात. त्यामुळेच शिवरायांच्या स्मृती आजही लहानथोरांच्या स्मरणात कायम आहेत. त्यामुळेच राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर शिवभक्तांची आजही मोठी गर्दी पाहायला मिळते.