Shivrajyabhishek Sohala 2020: छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारे '5' सिनेमे!
छत्रपति शिवाजी महाराज (Photo Credits: Instagram)

Chhatrapati Shivaji Maharaj Movies: छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्यच प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, पराक्रम यावर अनेक मालिका, सिनेमे काढण्याचा मोह कलाकारांना आवरला नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला उमगलेले महाराज पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला. 'बाळ शिवाजी' या सिनेमापासून ते अगदी आतापर्यंतच्या 'फर्जंद' या सिनेमापर्यंत अनेकांनी शिवाजी महाराज सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. आज 6 जून म्हणजेच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din). या दिवशी महाराजांनी स्वराज्याचे राजे म्हणून शपथ घेतली. आज 346 वा शिवराज्याभिषेक दिन. या दिनानिमित्त पाहुया छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारे काही सिनेमे. (Shivrajyabhishek Sohala 2020: शिवराज्याभिषेक दिनी ऐकूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील खास पोवाडे!)

'प्रभो शिवाजी राजा' अॅनिमेडेट मूव्ही:

'फर्जंद' या सिनेमात चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय...' हा महेश मांजेरकर यांचा सिनेमा चांगलाच गाजला होता.

फत्तेशिकस्त यातही अभिनेता चिन्मय मांडलेकर शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे.

'बघतोस काय मुजरा कर...' सिनेमा शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या किल्ल्यांवर आहे.

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे शिवभक्तांना रायगडावर जाऊन सोहळा अनुभवता येणार नाही. त्यामुळे शिवभक्तांसाठी गतवर्षीचा सोहळा लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून अनुभवण्याची सोय करण्यात आली आहे.