Shivrajyabhishek Din 2022 Messages: श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या घटनांपैकी एक असल्याने सर्व महाराष्ट्रीय लोक श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करतात. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. 1674 मध्ये त्यांनी मराठा साम्राज्याचा पाया घातला. रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांना "छत्रपती" ही पदवीही देण्यात आली होती. असे म्हणतात की, 4 ऑक्टोबर 1674 रोजी शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा छत्रपती ही पदवी धारण केली.
शिवराज्याभिषेक दिनाचे निमित्त साधून मराठमोळ्या शुभेच्छा, Messages, Greetings, Whatsapp Status, Images, Facebook च्या माध्यमातून शेअर करून शिवप्रेमी आणि मराठी बांधवांसोबत खास शुभेच्छा नक्की द्या.
इतिहासालाही धडकी भरेल
असं धाडसं या मातीत घडलं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
सुवर्णसिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा...!
स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले
रायगडाचे माथे फुलांनी सजले... पाहुन सोहळा
'छत्रपती' पदाचा 33 कोटी देवही लाजले...
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं...!!
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
मुघलांच्या हातावर तुरी देण्यात आणि भारताचा इतिहास गौरवशाली बनवण्यात शिवाजी महाराजांचे योगदान अविस्मरणीय आहे. यामुळेचं 6 जून हा दिवस केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद मानला जातो. या दिवशी मुघलांचा पराभव करून शिवाजी महाराजांनी राजा म्हणून राज्याभिषेक केला. या दिवशी त्यांना छत्रपतीची उपाधी देण्यात आली.