Shiv Jayanti Tithi Date 2022: तारखेनुसार 19 फेब्रुवारी पण तिथी नुसार यंदा छत्रपती शिवाजी महाराज जयंती कधी? घ्या जाणून
Shiv Jayanti 2022 | File Image

महाराष्ट्रात शिव जयंती (Shiv Jayanti) कधी साजरी करायची याबाबत शिवप्रेमींमध्ये दोन गट आहेत. काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिव जयंती साजरी करतात. आज 19 फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती तारखेनुसार साजरी केली जाते. तर दुसरी शिव जयंती ही तिथीनुसार साजरी केली जाते. तिथीनुसार शिवभक्त फाल्गुन वद्य तृतीया दिवशी साजरी करतात. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. नक्की वाचा: Interesting Facts About Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या खास गोष्टी तुम्हालाही देतील प्रेरणा.

शिवजयंती तारीख आणि तिथी वाद

महाराष्ट्र सरकारने 2001 मध्ये फाल्गुन वद्य तृतीया, 1551 (शुक्रवार. 19 फेब्रुवारी 1630) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख म्हणून स्वीकरली आहे. सरकार कडून या दिवशी शिवजन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्याची सरकारी सुट्टी देखील दिली जाते. या व्यतिरिक्त संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही जन्मतारीख होती. त्यानुसार अनेक शिवभक्त शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी शिवजयंतीचा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक शिवभक्त मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा करतात. त्यानुसार वेगवेगळ्या दिनदर्शिकांमध्ये वेगवेगळी तारीख दाखवली जाते.

शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. महाराष्ट्रावर असलेल्या विजापूरच्या आदिलशाहीचा आणो मोघलांचा बिमोड करून शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.