
महाराष्ट्रामध्ये जशी देवांची पूजा केली जाते तशीच इथे शिवरायांचीही (Chhatrapati Shivaji Maharaj) पूजा केली जाते. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे आदर्श अजूनही सध्याची पिढी अनुसरत असताना दिसत आहे व पुढेही करत राहील. ज्यांनी मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार रोवला अशा शिवाजी महाराज यांची आज जयंती (Shivaji Maharaj Jayanti 2021). हा दिवस कोणत्याही मराठी व्यक्तीसाठी एकाद्या सणापेक्षा कमी नाही. नुसते महाराजांचे नाव, जय भवानी जय शिवाजीची ललकार आपल्याला खूप प्रेरणा देऊन जाते. मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे, 19 रोजी साजरा केला जातो.
महाराष्ट्र सरकारने 2001 साली फाल्गुन वद्य तृतीया शके 1551, शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता म्हणूनच शिवप्रेमींसाठी हे ठिकाण एखाद्या मंदिरासारखे आहे. महाराजांनी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्माण केला. तर अशा शिव जयंतीला खास मराठी HD Images, Greetings, Wishes, Messages, Facebook आणि Whatsapp Status शेअर करून शुभेच्छा देऊ शकता.






(हेही वाचा: Shiv Jayanti 2021 Simple Rangoli Design: शिव जयंती निमित्त काढा सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन्स)
दरम्यान, 1869 साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती. महाराजांच्या जन्मतारखेबाबतही अनेक वाद होते. 19 फेब्रुवारी 1630 व 6 एप्रिल 1627 अशा या दोन तारखा होत्या. यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समितीही स्थापन केली होती. शेवटी सर्व नोंदी, बखरा आणि ऐतिहासिक दस्तावेज तपासल्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख निश्चित करण्यात आली.