
Santaji Maharaj Jayanti 2022 Messages: संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकारामांनी गायलेल्या अभंगांचे लेखन केलं. संताजी हे जातीने तेली होते. त्यांना 'संतु तेली' म्हणूनही ओळखले जाते असे. श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या चाकण गावात झाला. त्यांचा जन्म जगनाडे कुटुंबात श्री विठोबा पंत आणि मथुबाई यांच्या पोटी झाला. त्यांच्या घरातील वातावरण अध्यात्मिक आणि धार्मिक होते.
श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त Wishes, Wallpapers, Whatsapp Status, Images शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील फोटोज डाऊनलोड करू शकता.
संत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!

समाजाला कीर्तन-अभंगाच्या माध्यमातून
शिकवण देणारे संत संताजी जगनाडे महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!

संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

थोर संत संताजी जगनाडे महाराज
यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना
मन:पूर्वक शुभेच्छा!

तुकाराम गाथेचे लेखनिक संत संताजी जगनाडे महाराज
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा गावातील ब्राम्हणांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.