Jai Shriram HD Images : 17 एप्रिल रोजी देशभरात रामनवमीचा (Ram Navami 2024) सण साजरा केला जाणार आहे. वाल्मिकी रामायणानुसार, भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला, अभिजीत मुहूर्तावर आणि कर्क राशीत झाला. रामनवमी (Ram Navami) हा सण चैत्र नवरात्री (Chaitra Navratri) चा शेवटचा दिवस आहे. या दिवशी रामनवमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
रामनवमीला रामाची मंदिरे विशेष सजवली जातात. 17 एप्रिल रोजी अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याची तयारी सुरू आहे. यावेळी रामनवमीचा सण अत्यंत शुभ मुहूर्तावर साजरा होणार आहे. राम नवमी निमित्त तुम्ही खालील 'जय श्रीराम' या वाक्यासह WhatsApp Status, Images, Wallpapers द्वारे खास ईमेज शेअर करू शकता.
चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जाईल. या वर्षी चैत्र नवरात्रीला अतिशय शुभ योग तयार झाला आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी राम नवमीच्या दिवशी आश्लेषा नक्षत्र, रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत.