Nag Panchami 2023 Messages: हिंदू धर्मात नागपंचमीला खूप महत्त्व आहे. हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो. यावर्षी 21 ऑगस्ट रोजी नाग पंचमीचा (Nag Panchami) सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सर्पदेवतेची पूजा करतो त्याच्या मनातील सापांची भीती नाहीशी होते. यासोबतच कुंडलीतून कालसर्प दोष दूर करण्यासाठी या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते.
यंदाची नागपंचमी खूप खास असल्याचं म्हटलं जात आहे. वास्तविक या दिवशी दोन शुभ संयोग घडत आहेत जे अतिशय शुभ आहेत. किंबहुना या दरम्यान शुक्ल योग आणि अभिजीत मुहूर्त तयार होईल, जो खूप खास असल्याचे सांगण्यात येत आहे. नेटीझन्स दरवर्षी नागपंचमीनिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-परिवारास पंचमीच्या शुभेच्छा देत असतात. नागपंचमी निमित्त खालील मराठमोळे WhatsApp Status, Quotes, SMS, Wishes शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता.
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी...
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
हे नाग देवता, सप्र देवता सर्वांनां सुख,
समृद्धी आणि आरोग्य दे…
नागपंचमीच्या शुभेच्छा!
दूध, लाह्या वाहू नागोबाला
लग ग सखे वारुळाला
नागोबाला पूजायला...
नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
मान ठेवूया नाग राजाचा,
रक्षण करूया नागाचे,
जतन करूया आपल्या निसर्गाचे
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
नागपंचमी...
शेतकऱ्यांचा मित्र म्हणून
संबोधल्या जाणाऱ्या नाग देवतेची
पूजा करण्याचा आजचा दिवस
सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा !
नागपंचमी सण साजरा करण्याची अनेक कारणे आहेत. भोलेनाथांना साप फार प्रिय आहेत. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने भोलेनाथाची कृपा प्राप्त होते. नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने जन्मकुंडलीतून काल सर्प दोष समाप्त होतो, असाही समज आहे.