Shani Jayanti 2019 Marathi & Hindi Wishes: आज शनि जयंती म्हणजेच शनि अमावस्या. शनि देवाचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर येथे झाला. सूर्य देवाची पत्नी छाया हिने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना शनि देवाची पुत्र म्हणून प्राप्ती झाली.
भगवान शनिचे नाव ऐकताच सर्व भक्तांच्या मनात भीती दाटते. तर शनि देवाच्या प्रकोपाची सर्वांना धास्ती असते. मात्र शनि देव हे अत्यंत न्यायप्रिय देवता आहे. सद्कर्मे करणाऱ्यांना त्यांची कर्माची चांगली फळे मिळतात तर वाईट कर्म करणाऱ्यांना त्यांच्या कर्माची वाईट फळे अनुभवावी लागतात.
शनि जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास भक्तीमय WhatsApp Stickers, Facbook Greetings, SMS, HD Wallpapers आणि शुभेच्छापत्रं....
शनि जयंतीच्या शुभ प्रसंगी शनि देवाची पूजा करुन भगवान शनिच्या वाईट प्रभावापासून संरक्षण होऊ शकते. तुमच्यामागेही शनिची पीडा, साडेसाती असेल तर शनि जयंतीनिमित्त पूजा करुन तुम्ही शनि देवाची कृपा प्राप्त करु शकता.