Shahu Maharaj Jayanti 2022 Greetings: छत्रपती शाहू महाराज हे भारतातील खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जात होते. कोल्हापूरच्या इतिहासात ते आजही अमूल्य रत्न म्हणून प्रसिद्ध आहेत. छत्रपती साहू महाराज ही अशी व्यक्ती होती की ज्यांनी राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळीक ठेवली. दलित वर्गातील मुलांना मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन करून बाहेरील विद्यार्थ्यांना निवारा देण्याचे आदेश महारांजानी दिले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. 20 मार्च 1977 रोजी त्यांच्या आई राधाबाई यांचे निधन झाले तेव्हा छत्रपती शाहू महाराज केवळ 3 वर्षांचे होते. छत्रपती शाहू महाराज 20 वर्षांचे असताना त्यांचे वडील आबासाहेब घाटगे यांचे निधन झाले. राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, Imgaes, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन लोककल्याणकारी राजाच्या स्मृतीस करा अभिवादन.
छत्रपती शाहूजी महाराज यांचे 10 मे 1922 रोजी मुंबईत निधन झाले. महाराजांनी पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. शाहू महाराजांचे दलित वर्गाशी नितांत प्रेम होते. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने त्यांनी केलेले क्रांतिकारी पाऊल इतिहासात स्मरणात राहील.