
कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, भारतीय समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांची आज जयंती. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व त्यांचे नाव 'शाहू' असे ठेवले. छत्रपती शाहू महाराज एक राजा असूनही त्यांनी दलित व उत्पीडित वर्गाचे दु: ख समजून घेत त्यांच्याशी सदैव जवळीक साधली. त्यांनी दलित वर्गातील मुलांना मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली.
शाहू महाराजांचे समाजकार्य फार मोठे आहे. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी 1919 मध्ये सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. त्यांनी सामाजिक सुधारणांबरोबरच शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. तर अशा लोकराजाच्या जयंतीनिमित्त या खास मराठी Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images, Quotes शेअर करून करा अभिवादन






दरम्यान, शाहू महाराजांनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. महाराजांनी सुमारे 28 वर्षे राज्यकारभार केला. तर असे हे लोकनेते शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली.