कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, भारतीय समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांची आज जयंती. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व त्यांचे नाव 'शाहू' असे ठेवले. छत्रपती शाहू महाराज एक राजा असूनही त्यांनी दलित व उत्पीडित वर्गाचे दु: ख समजून घेत त्यांच्याशी सदैव जवळीक साधली. त्यांनी दलित वर्गातील मुलांना मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली. (Shahu Maharaj Jayanti 2021 Wishes: राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त Messages, Quotes आणि Images च्या माध्यमातून राजाला करा त्रिवार अभिवादन!)
आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अनेक नेत्यांनी ट्वीट करत त्यांना अभिवादन केले आहे. पाहूयात नेत्यांनी केलेले ट्वीट.
अजित पवार
उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी समाजात पुरोगामी विचार रुजवणारे,शेतकऱ्यांचे तारणकर्ते,बहुजनांचे पालनकर्ते,नोकरीत आरक्षण,महिला सक्षमीकरणासाठी मोलाची भूमिका बजावणारे सामाजिक न्यायाचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/ZnOB8PnqyZ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 26, 2021
राजेश टोपे
बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी लढणारे, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी झटणारे, ‘सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ अशा शब्दांत यथार्थपणे गौरविले गेलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन! pic.twitter.com/C1pBIlJvqP
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 26, 2021
देवेंद्र फडणवीस
सामाजिक सुधारणांचे अग्रणी, शोषित, वंचित, पीडितांचे रक्षणकर्ते राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी शत शत नमन! pic.twitter.com/jrWvjESJxy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 26, 2021
प्रकाश आंबेडकर
Remembering Rajarshi Shahu Maharaj, a revolutionary king on his birth anniversary today.His contributions in the Social Justice and Reform movement will always be remembered fondly.His work and ideas are still relevant to us in our struggle against Sanatani forces#ShahuMaharaj pic.twitter.com/RwbAyW4hjC
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 26, 2021
नवाब मालिक
अस्पृश्य- बहुजन समाजासाठी प्राणपणाने लढणारे कृतिशील आणि प्रयोगशील राजे, थोर समाजसुधारक, विचारवंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!#शाहूमहाराज pic.twitter.com/Pug2KZ9Zpq
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) June 26, 2021
शाहू महाराज यांच्या जयंती दिनी त्यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांना मानवंदना दिली जाते. त्यांनी समता, बंधूतेचा संदेश दिला. दलितांवरील अन्याय दूर करण्यासाठी ते अखंड झटले.