
भारतामध्ये 23 मार्च हा दिवस शहीद दिवस (Shaheed Diwas) म्हणून पाळला जातो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये देशभक्तीसाठी भगत सिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर या तिघांना ब्रिटीशांनी फाशीची शिक्षा दिली. या तिघांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ भारतात 23 मार्चला हौताम्य दिन किंवा शहीद दिवस पाळण्याची पद्धत आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या अनेक वीरांना या दिवसानिमित्त आदरांजली व्यक्त केली जाते. मग तुम्ही देखील स्वातंत्र्यसेनानींच्या लढ्यातील योगदानाला आणि वीर हौताम्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Greetings शेअर करत शहीद दिवस पाळू शकता.
शहीद दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर गाणी लावून, पुढल्या पिढीला भारतभूमीसाठी प्राणांची आहुती देणार्या वीर योद्धांच्या कहाण्या सांगून देशप्रेमाची भावना निर्माण केली जाते.
शहीद दिनाच्या शुभेच्छा






शहीद दिन भारतामध्ये 23 मार्च प्रमाणे 30 जानेवारीला देखील साजरा केला जातो. 30 जानेवारी दिवशी महात्मा गांधींच्या स्मरणार्थ शहीद दिन साजरा केला जातो. नथुराम गोडसेंनी गांधींची हत्या केल्यानंतर महात्मा गांधींचा 30 जानेवारी 1948 ला मृत्यू झाला.