![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/1-13-380x214.jpg)
Shab-E-Barat 2020 Hindi Wishes: शब-ए-बारात (Shab e Barat) ही शबान महिन्यातील (Mid-Sha'ban) मुस्लिम समाजासाठीची महत्त्वाची रात्र असते. या रात्री मुस्लिम बांधव आपल्या चूकांची कबुली अल्लाहकडे देतात. तसेच भविष्यातील सुख, शांती, यश, समृद्धी यासाठी प्रार्थना करतात. 'शब' म्हणजे रात्र आणि 'बरात' एक अरबी नाव आहे, ज्याचा अर्थ निरपराधीपणा असा होतो. शाबान महिन्याच्या (Shaban Month) 14 तारखेच्या सूर्यास्तानंतर ‘शब-ए-बारात’ च्या रात्रीला सुरूवात होते. यंदा इस्लामिक कॅलेंडरनुसार, 8 एप्रिलला म्हणजेच आज शब-ए-बारात ची रात्र येत आहे. त्यामुळे 'शब-ए-बारात' च्या निमित्ताने HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन आपल्या मुस्लिम बांधवाना शुभेच्छा नक्की द्या.
शब-ए-बारातच्या रात्री जागून अल्लाहकडे प्रार्थना केली जाते. तसेच कुराणाचे पठण केले जाते. याशिवाय कब्रस्तानला भेट देऊन पूर्वजांच्या स्मृतिस्थळावर फूल वाहून आदरांजली व्यक्त केली जाते. अल्लाहची प्रार्थना करताना मृत्यूनंतर ‘जन्नत’ प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थनाही केली जाते. या रात्री मुस्लिम बांधव अल्लाकडे चुकांची कबुली देऊन त्यातून मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थना करतात. (हेही वाचा - Hanuman Jayanti 2020: हनुमान जयंती साजरी करण्याचे महत्व काय? जाणुन घ्या बजरंगबलीची जन्मकथा आणि यंदाचा मुहुर्त)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/4-9.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/3-11.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/5-10.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/2-13.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/1-13.jpg)
मुस्लिम समाजामध्ये शब-ए-मेराज, शब-ए-बारात आणि शब-ए-कद्र अशा तीन रात्री महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यातील एक महत्त्वाची रात्र म्हणजे शब-ए-बारात. शिय्या आणि सुन्नी अशा दोन्ही पंथातील बांधव ही ‘शब-ए-बारात’ ची रात्र साजरी करतात. सुन्नी मुसलमानांच्या मते या रात्री अल्लाहने प्रेषित नोह आणि त्याचे जहाज पूरापासुन वाचवले तर शिय्या मुसलमानांच्या मते या दिवशी 12 वे शिय्या इमाम मोहम्मद अल महंदी यांचा जन्म झाला.