
Husband Appreciation Day 2025 Messages: एप्रिल महिन्यातील तिसरा शनिवार हा पती कौतुक दिन (Husband Appreciation Day 2025) म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस 19 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस तुम्हाला तुमच्या पतीवर प्रेमाचा वर्षाव करण्याची खास संधी देतो. पती कौतुक दिन (Husband Appreciation Day) हा तुमच्या दैनंदिन जीवनात थोडा वेळ काढून तुमच्या पतीला त्याच्या पाठिंब्याबद्दल, त्याच्या सहवासाबद्दल आणि तुमच्या जीवनाचा भाग असल्याबद्दल त्याचे कौतुक करण्याची आठवण करून देतो.
पती कौतुक दिनाची उत्पत्ती अज्ञात आहे, तसेच तो ज्या व्यक्तीने तयार केला त्याचे नाव देखील अज्ञात आहे. तथापि, काही लोकांचा असा विश्वास आहे की हा दिवस फादर्स डेच्या प्रतिरूप म्हणून शोधण्यात आला होता, जेणेकरून संतती नसलेल्या पतींना त्यांच्या सन्मानार्थ एक दिवस साजरा करता येईल. या दिवशी महिला आपल्या पतीच्या पाठींब्यासाठी, त्यांच्या निस्वार्थ प्रेमाबद्दल भावना व्यक्त करतात. आज आम्ही तुमच्यासाठी हसबंड ऍप्रिशिएशन डे निमित्त काही WhatsApp Status, Greetings घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियाद्वारे शेअर करून तुमच्या पतीचा हा दिवश आणखी खास करू शकता आणि तुमचं त्याच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता.





कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे ही पतीची एकमेव भूमिका आहे, असं समजण्याचे दिवस आता गेले आहेत. कारण, आता प्रत्येक पुरुष त्याच्या पत्नीला घरकामात, स्वयंपाकात आणि मुलांची काळजी घेण्यात मदत करतात. तुमचा पती तुम्हाला प्रत्येक गोष्टींत पाठींबा देत असेल, तर हा दिवस तुमच्यासाठी खरचं खास आहे. कारण, तुम्ही या दिवशी आपल्या पतीला त्याच्याबद्दल तुम्हाला वाटणाऱ्या भावना व्यक्त करू शकता.