Swami Vivekananda Jayanti 2025 Messages 6 (फोटो सौजन्य - File Image)

Swami Vivekananda Jayanti 2025 Messages In Marathi: देशभरातील तरुणांसाठी स्वामी विवेकानंदांचे (Swami Vivekananda) जीवन एक प्रेरणास्रोत आहे. त्यांचे विचार आणि भाषणे आजही तरुणांना यशाच्या मार्गावर पुढे जाण्यास शिकवतात. स्वामी विवेकानंदांनी सांसारिक इच्छांचा त्याग केला. त्यांनी ज्ञानाच्या शोधात आपले जीवन समर्पित केले. त्यांचे मौल्यवान विचार प्रत्येक तरुणाच्या जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करतात. स्वामी विवेकानंद यांची जयंती (Swami Vivekananda Jayanti 2025) युवा दिन (National Youth Day 2025) म्हणूनही साजरी केली जाते.

दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. हा दिवस तरुणांसाठी प्रेरणास्थान मानल्या जाणाऱ्या स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. 1984 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 'आंतरराष्ट्रीय युवा वर्ष' घोषित केले. यानंतर, भारत सरकारने 1984 मध्ये 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त तुम्ही खालील Messages, Images, Greetings, Quotes शेअर करून आपल्या मित्र-परिवारास राष्ट्रीय युवा दिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता.

उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका

स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Swami Vivekananda Jayanti 2025 Messages 1 (फोटो सौजन्य - File Image)

स्वतंत्र होण्याचं धाडस करा.

जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत

तिथपर्यंत जाण्याचं धाडस करा

आणि ते तुमच्या रोजच्या जगण्यातही

आणण्याचं धाडस करा.

स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Swami Vivekananda Jayanti 2025 Messages 2 (फोटो सौजन्य - File Image)

जो अग्नी आपल्याला उब देतो

तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो.

पण हा अग्नीची दोष नाही.

स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा!

Swami Vivekananda Jayanti 2025 Messages 3 (फोटो सौजन्य - File Image)

सर्वात मोठा धर्म म्हणजे

आपल्या स्वभावाप्रती खरं असणं.

स्वताःवर विश्वास ठेवा

स्वामी विवेकानंद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Swami Vivekananda Jayanti 2025 Messages 4 (फोटो सौजन्य - File Image)

ज्या वेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल,

त्याचवेळी ते केलं ही पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल

स्वामी विवेकानंद जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Swami Vivekananda Jayanti 2025 Messages 5 (फोटो सौजन्य - File Image)

युवा दिनाचे महत्त्व -

स्वामी विवेकानंदांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याकडून आत्मसाक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांनी हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले. स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत होते. त्यांनी प्रेरणादायी संदेशांद्वारे लोकांना जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला. त्यांच्या कथा आजही लोकांना प्रेरणा देतात. गुरु रामकृष्ण परमहंसांकडून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. जीवनाचा खरा उद्देश सर्वांना कळावा अशी त्यांची इच्छा होती, म्हणून त्यांनी लोकांना आपले प्रेरणादायी विचार सांगितले.