
Human Rights Day 2023 Messages: आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन (Human Rights Day 2023) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 1948 मध्ये मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा स्वीकारली. त्या दिवसाचे स्मरण केले जाते. मानवी हक्क दिनाची औपचारिक सुरुवात 1950 मध्ये झाली, जेव्हा सर्वसाधारण सभेने ठराव 423 (V) संमत केला. ज्याने सर्व राज्ये आणि इच्छुक संस्थांना दरवर्षी 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले.
कोणत्याही व्यक्तीचा जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य, समानता आणि आदर हा मानवी हक्कांतर्गत येतो. परंतु, बहुतेक लोकांना या अधिकारांची माहिती नसते. त्यांना या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठीच मानवी हक्क दिनाचे आयोजन केले जाते. मानवी हक्क दिनानिमित्त तुम्ही Wishes, Wallpapers, Whatsapp Status, Images, Quotes द्वारे मित्र-परिवारास खालील शुभेच्छापत्र पाठवू शकता. (हेही वाचा - Human Rights Day: मानवी हक्क जाहीरनाम्यामधील 'हे' मानवाधिकार तुम्हाला माहीत आहेत का?)
मानवी हक्क दिनाचा प्रसंग आपल्याला आठवण करून देतो
आपण सर्व समान हक्क घेऊन जन्माला आलो आहोत
आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.
या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

गरीब, श्रीमंत, लहान, मोठे, असो हिंदू व मुसलमान;
सर्वाना मिळो अधिकार, हीच आमची इच्छा!
मानवी हक्क दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

एकताचे बल दाखवूया अधिकारांची रक्षा करूया,
सगळ्यांना देऊ ज्ञान मानावाधीकाराने मान.
मानवी हक्क दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

आपण कोणत्याही अन्यायाशी अस्वस्थ होऊ नका,
मानवी हक्क आयोग तुमच्यासाठी आहे हे विसरू नका.
मानवी हक्क दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मानवी हक्क दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

भारत सरकारने 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केली. हा कायदा 28 सप्टेंबर 1993 पासून लागू झाला. नागरी आणि राजकीय हक्कांसोबतच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कही आयोगाच्या अंतर्गत येतात.