Photo Credit - File

Ganesh Visarjan 2025 Wishes In Marathi: गणेशोत्सव हा 10 दिवस चालणारा उत्सव आहे, जो गणपती बाप्पाच्या विसर्जनाने संपतो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेश विसर्जन केले जाते, यालाच अनंत चतुर्दशी असेही म्हणतात. ज्यांच्या घरी बाप्पा 10 दिवस राहतात, ते अनंत चतुर्दशीला त्यांचे विसर्जन करतात. गणेश भक्त आनंदाने बाप्पाला निरोप देतात आणि पुढील वर्षी पुन्हा लवकर येण्याची प्रार्थना करतात. (हे देखील वाचा: Ganesh Chaturthi 2025: पुण्यातील दगडूशेठपासून मुंबईच्या सिद्धिविनायकापर्यंत; बाप्पाच्या दर्शनासाठी भारतातील 10 सर्वात प्रसिद्ध मंदिरे)

या वर्षी अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर, सोमवार रोजी आहे, याच दिवशी गणेश विसर्जन केले जाईल. गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्त एकमेकांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देतात. तुम्हीही अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा, व्हॉट्सअॅप स्टेटस, कोट्स आणि फेसबुक मेसेज शेअर करून बाप्पाला निरोप देऊ शकता. तुम्ही यासाठी खालील प्रतिमा वापरू शकता.

डोळ्यात आले अश्रू,

बाप्पा आम्हाला नका विसरू,

आनंदमय करून चालला तुम्ही,

पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही….

गणपती बाप्पा मोरया...

पुढच्या वर्षी लवकर या...

Photo Credit - File

अडचणी खूप आहेत जीवनात,

पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद फक्त तुझ्यामुळे येते… निरोप घेताना एकच आर्शीवाद दे

या संकटातून सर्वांची सुखरूप सुटका होऊ दे…

गणपती बाप्पा मोरया...

पुढच्या वर्षी लवकर या...

Photo Credit - File

निरोप देतो देवा आज्ञा असावी,

चुकले आमचे काही देवा क्षमा असावी…

गणपती बाप्पा मोरया...

Photo Credit- File

वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया,

वरदहस्त असूद्या माथी,

राहू द्या सदैव तुमची छत्रछाया,

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या…

Photo Credit- File

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,

निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा…

गणपती बाप्पा मोरया,

पुढच्या वर्षी लवकर या...

Photo Credit- File

गणरायांना निरोप देताना मन खरंच जड होतं,

पण आशा आहे पुढच्या वर्षी बाप्पा लवकरच येतील.

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

अनंत चतुर्दशी 2025 ची भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथी 6 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 3.12 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1.41 वाजता समाप्त होईल.