Ganesh Visarjan 2024 Messages In Marathi: भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) पर्यंत गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) मोठ्या भक्ती-भावाने साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप दिला जातो. या दिवशी विधीवत पूजा, आरती, नैवैद्य दाखवून गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. यंदा मंगळावारी म्हणून 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी होणार आहे. त्यामुळे या दिवशी गणपती विसर्जन (Ganpati Visarjan 2024) केले जाईल.
या दिवशी अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. आम्ही तुमच्यासाठी अनंत चतुर्दशी स्लोगण, अनंत चतुर्दशी मराठी संदेश, अनंत चतुर्दशी संदेश, गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस, गणपती विसर्जन कोट्स, गणपती विसर्जन मेसेज, गणपती विसर्जन शुभेच्छापत्र घेऊन आलो आहोत. तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे शुभेच्छा संदेश शेअर करून आपल्या मित्र-परिवारास अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा पाठवू शकता.
सेवा जाणुनी, गोड मानुनी,
द्यावा आर्शीवाद आता,
निरोप घेतो देवा आता पुढच्या वर्षी लवकर या…
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
गजानना गजानना करीत तुजसि प्रार्थना
कृपा सदैव ठेव तू मनात हीच कामना..
गणपती बाप्पा मोरया
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखकर्ता, दु:खहर्ता…
गणपती बाप्पा मोरया
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
जीव जडला चरणी तुझिया..
आधी वंदू तुज मोरया…
गणपती बाप्पा मोरया
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
येतोस तू वाजत गाजत बाप्पा
जातोस ही मोठ्या धूमधडाक्यात
सर्वांचा बाप्पा लाडका
आमच्या मनामनात वसलेला
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा !
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन केले जाते. या दिवशी गणपतीच्या विसर्जनासाठी सर्वात शुभ मुहूर्त 3:20 ते 4:50 पर्यंत असेल. हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे.