
Sardar Vallabhbhai Patel Jayanti 2021 Wishes: प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोंबरला भारतातील लोहपुरुष म्हणून ओळख असणाऱ्या सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवसाला राष्ट्रीय एकता दिवस म्हणून सुद्धा संबोधले जाते. खरंतर 2014 मध्ये 31 ऑक्टोंबरला सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोंबर 1875 रोजी नाडियाद येथे झाला होता. त्यांच्या आईचे नाव लाडबा पटेल तर वडिलांचे नाव झावेर भाई होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वल्लभ भाई पटेल यांनी मोठे योगदान दिले आहे. यंदाच्या वर्षी सरदार पटेल यांची 145 वी जयंती साजरी केली जाणार आहे.
सरदार पटेल यांनी तुकड्यांमध्ये विभागलेल्या भारताला एकत्रित करण्यासाठी जे कार्य केले त्यामुळे त्यांना लोहपुरुष म्हणून संबोधले जाऊ लागले. तर सरदार पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. तर सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून साजरा करा राष्ट्रीय एकता दिवस.






सरदार पटेल यांनी देशातील सुमारे 562 लहान-मोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण केले होते आणि त्याद्वारे भारतीय एकात्मता निर्माण करण्यात त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. एवढेच नाही तर भारतीय राज्यघटनेला आकार देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 24 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने स्थापन केलेल्या सल्लागार समितीचेही त्यांनी नेतृत्व केले, ज्यांची जबाबदारी मूलभूत आणि अल्पसंख्याक हक्कांवरील अंतरिम अहवाल तयार करण्याची होती.