महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा आहे. या संत मंडळींपैकी एक नाव म्हणजे संत नामदेव (Sant Namdev) . आषाढ कृष्ण त्रयोदशीचा दिवस हा संत नामदेवांच्या पुण्यतिथीचा (Sant Namdev Punyatithi) दिवस आहे. आज 6 ऑगस्ट दिवशी ग्रेगेरियन कॅलेंडर नुसार, संत नामदेव पुण्यतिथी आहे. मग आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना वंदन करून वारकरी मंडळींना या दिवसाच्या निमित्ताने सोशल मीडीयात संत नामदेव पुण्यतिथी फोटो नक्की शेअर करा.
संत नामदेव हे संतपरंपरेमधील संत शिरोमणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे महाराष्ट्राबाहेर देखील त्यांची महती आहे. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक म्हणून त्यांची महती आहे.
संत नामदेव पुण्यतिथी
हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव आहे. त्यांचे बालपण पंढरपूरात गेले आहे. भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी संत नामदेवांचे मंदिर उभारले आहे.