Sant Gadge Baba Jayanti 2023: महान संत गाडगे बाबा यांची आज जयंती आहे. महान संत गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी त्यांचा जन्म झाला होता. संत गाडगे बाबा महाराज यांचे विचार हे नेहमीच समाजाला प्रेरणादायी ठरतात. संत गाडगे बाबांना सामाजिक न्याय, स्वच्छता आणि समाजसुधारणा या गोष्टींमध्ये रस होते. संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव देबूजी झिंगरजी जानोरकर असे होते. संत गाडगे बाबा यांनी त्यांचे सर्व जीवन समाजसेवेसाठी अर्पण केले होते. परंतु गाडगेबाबा यांचे विचार आजही प्रेरणा देतात. गाडगे बाबांनी गावोगावी फिरून लोकांची मने स्वच्छ केली आहेत, दरम्यान आज संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांचे अमूल्य विचार संदेशच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत, शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी करू शकता.
पाहा, संदेश
सोशल मीडियाच्या माध्यामतून तुम्ही हे संदेश पाठवून संत गाडगे बाबा यांचे विचार इतरांपर्यंत पोहोचवू शकतात, संत गाडगे बाबा यांची जयंती त्यांचे अमूल्य विचार शेअर करून साजरी करा, संत गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन!