
Sankashti Chaturthi Chandroday Time: गणेशभक्तांसाठी दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) खास असते. मार्च महिन्यात संकष्टी चतुर्थी 17 मार्च दिवशी आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आराधना केली जाते. काही गणेशभक्त या दिवसाचं औचित्य साधून दु:खावर सुखाने मात करावी आणि सार्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी खास व्रत ठेवलं जातं. अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास संध्याकाळी चंद्रोदयानंतर बाप्पाची आरती करून सोडतात. मग 17 मार्चच्या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची तुमच्या शहरातील वेळ काय आहे? हे देखील नक्की जाणून घ्या.
हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी आहेत, शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते अशी धारणा आहे. नक्की वाचा: Sankashti Chaturthi 2025 HD Images: संकष्टी चतुर्थी निमित्त Messages, Wallpaper, WhatsApp Status द्वारे गणेशभक्तांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा!
17 मार्च संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ
मुंबई- 21.20
पुणे - 21.15
रत्नागिरी- 21.15
नाशिक - 21.17
नागपूर - 20.57
गोवा- 21.11
बेळगाव- 21.09
संकष्टी चतुर्थीचं हे व्रत चंद्रोदय व्यापिनी चतुर्थी तिथीला पाळले जाते. जर चंद्रोदय व्यापिनी चतुर्थीचे दोन दिवस असतील तर पहिला दिवस उपवासासाठी निवडला जातो. 17 मार्च 2025 रोजी चंद्रोदयाची वेळ 09:18 असणार आहे. म्हणून 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. या दिवसाच्या निमित्ताने मंदिरातही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठी रांग असते. संकष्टीच्या निमित्ताने घराघरात बाप्पाच्या आवडीच्या नैवेद्याची मेजवानी असते. यामध्ये मोदकंही आवर्जुन केले जातात. बाप्पाला दुर्वा, जास्वंद अर्पण केले जाते.