प्रत्येक महिन्याला कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) साजरी केली जाते. एका वर्षात 12 आणि अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी असतात. गणेश भक्तांसाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस अगदीच खास असतो. काही गणेशभक्त संकष्टी चतुर्थी दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा अर्चना करण्यासोबतच उपवास देखील करतात. या दिवशी सुख, समृद्धी , शांती यासाठी संकष्ट चतुर्थीचं व्रत करण्याची पद्धत आहे. या डिसेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज (15 डिसेंबर) दिवशी साजरी केली जाणार आहे. परंपरेनुसार संकष्टीचा उपवास करणारे चंद्रोदय झाल्यानंतर गणपती समोर नैवेद्य दाखवून नंतर उपवास सोडतात. मग पहा आज संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडण्यासाठी पहा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी मधील चंद्रोदयाची वेळ काय?
मराठी संस्कृतीनुसार सध्या मार्गशीर्ष महिना सुरु आहे, या महिन्याचे धार्मिक महत्व बघता या महिन्यातील संकष्टीचा योग आणखीनच खास आहे. महाराष्ट्रात गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचं औचित्य साधून गणरायाच्या मंदिराला भेट देतात. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी होते.
मुंबई -21. 09
पुणे- 21.06
नाशिक - 21.04
नागपूर- 20.39
रत्नागिरी - 21.11
संकष्टी चतुर्थीला उपवास सोडताना मोदकांचा नैवेद्य दाखवतात. तसेच गणरायाच्या पूजेमध्ये आज जास्वंद, दुर्वा यांचा वापर केला जातो. 108 वेळा श्री गणेशाय नम: मंत्राचा जप करून गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. यामुळे संकटं दूर होतात.