Sambhaji Maharaj Balidan Din 2021: छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिन निमित्त मराठी Messages, Images शेअर करुन करा शंभुराजेंना अभिवादन!
Sambhaji Maharaj Punya Tithi 2021 | File Photo

Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2021 Messages: 11 मार्च रोजी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी असते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तब्बल 9 वर्ष स्वराज्याचा कार्यभार सांभाळला. अनेक लढाय्या जिंकल्या. मात्र त्यांचे स्वराज्यप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि शौर्य हे त्यांच्या शेवटच्या दिवसातून अधिक ठळकपणे दिसून येते. शत्रुच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा होवूनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. त्यांचे हे शौर्य अजरामर झाले. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान दिन म्हणूनही साजरा केला जातो. Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din 2021 Images: छत्रपती शंभुराजे बलिदान दिनानिमित्त Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून करा विनम्र अभिवादन!

अशा शूर, पराक्रमी छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मराठी Messages, Images, Wallpapers सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन शंभुराजेंना अभिवादन करुया.

शंभूराजे पुण्यतिथी मेसेजेस:

गिळण्यास प्राण उठला जरी ही कृतांत

संभाजी धर्म जगले जळत्या रणांत |

सुर्याहूनी ही अती दाहक धर्मभक्ती

स्फुरण्यास नित्य धरुया शिवपुत्रचित्ती ||

छत्रपती संभाजी राजे यांना बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2021 | File Photo

कोंढाण्यासाठी तानाजी गेला

घोडखिंडीसाठी समोर बाजी आला...

महाराष्ट्रधर्म वाढवण्यासाठी

स्वराज्य रक्षक संभाजी झाला...

संभाजी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2021 | File Photo

शत्रू ही मरताना ज्याचं कौतुक करून गेला

असा वाघाचा छावा संभाजी

सह्याद्रीचा दूसरा राजा होऊन गेला

शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2021 | File Photo

लाचार होऊनी कधीं कधीं ना जगावें,

त्याहुनी वीष गिळुनी त्वरया मरावें..

शिवसिंहसदृश बनू अति स्वाभीमानी,

संभाजी नाही झुकले यमयातनांनी...

शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2021 | File Photo

पाहुनी शौर्य तुझंपुढे

मृत्यूही नतमस्तक झाला

स्वराज्याच्या मातीसाठी

माझा शंभू अमर झाला

पुण्यतिथीनिमित्त शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Sambhaji Maharaj Punya Tithi 2021 | File Photo

संभाजी महाराजांच्या मृत्यूची कथा अंगावर काढा आणणारी आहे. छत्रपतींचा मृत्यूची कथा प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला हेलावणारी आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावे कसे हे शिकवले. तर मरावे कसे हे संभाजी महाराजांनी दाखवून दिले, असे म्हटले जाते.