![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/Annabhau-Sathe-5-380x214.jpg)
Annabhau Sathe Jayanti 2023 Messages: मराठी साहित्य आणि कलेच्या शिखरावर असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील मांगबाडा येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव तुकाराम होते. वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव बालुबाई. ते मातंग समाजाचे होते. त्याकाळी मातंग समाजातील लोकांना अस्पृश्य मानलं जात असे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्या जातीतील मंडळी लग्न, सण, सण प्रसंगी ढोल-ताशा वाजवत असतं. नाच-गाणी करून लोकांचे मनोरंजन करत असतं. अस्पृश्य असल्याने त्यांना गावात राहण्यास बंदी होती. त्यामुळे गावाबाहेर राहत होते.
अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. ते मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. दलित साहित्याचे संस्थापक अशी त्यांची ओळख आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार Wishes, Whatsapp Status, Quotes, Greetings द्वारे शेअर करून तुम्ही त्यांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/Annabhau-Sathe-5.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/Annabhau-Sathe-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/Annabhau-Sathe-3.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/Annabhau-Sathe-4.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/Annabhau-Sathe-2.jpg)
अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडा आणि लावणीच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती घडवण्याचे कार्य केले. साठे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीनुसार दलित कार्याकडे वळले. 1958 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनातील आपल्या सुरुवातीच्या भाषणात ते म्हणाले होते की, पृथ्वी शेषनागच्या डोक्यावर नाही तर दलित आणि कामगारांच्या तळहातावर आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे खास विचार शेअर करून तुम्ही त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता.