Republic Day 2021 Wishes in Marathi: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन भारतमातेला करा सलाम!
Republic Day 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

Happy Republic Day Wishes in Marathi: प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून यावी असा दिवस म्हणजे 'प्रजासत्ताक दिन'.... आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला मात्र त्याची लोकशाही राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली. म्हणून हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिन (Republic Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला 'गणराज्य दिन' असेही म्हणतात. या दिवशी दिल्लीतील राजपथावर परेड आणि देशाची परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविणा-या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवसाची आठवण म्हणून आपण सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवू शकतो.

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता आपण सार्वजनिकरित्या हा दिवस साजरा करु शकत नसलो तरी घरी राहून एकमेकांना या गौरवास्पद दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतो.

प्रजासत्ताक दिनाच्या Wishes, WhatsApp Status, Messages पाठवविण्यासाठी मराठीतून खास शुभेच्छा संदेश:

बलसागर भारत व्हावे विश्वात शोभूनी राहावे

भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी

हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

Republic Day 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी

हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती सारे एकच आम्ही

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

हेदेखील वाचा- Republic Day 2021 Parade मध्ये पाहायला मिळणार कोविड-19 लसीच्या निर्मितीची झलक

Republic Day 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंचच उंच

जय हिंद, जय भारत हा जयघोष आज गर्जु दे आसमंत

Happy Republic Day!

Republic Day 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी दिले बलिदान

ज्या शूरवीरांनी कायम राखली तिरंग्याची शान

त्यांच्या त्यागापुढे आपण आहोत खूपच लहान

आज सर्वांनी मिळून म्हणूया 'माझा भारत महान'

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

स्वातंत्र्याची ध्वजा फडकते

सूर्य तळपतो प्रगतीचा

भारतभूच्या पराक्रमाला

मुजरा या महाराष्ट्राचा

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

Republic Day 2021 Wishes in Marathi (Photo Credits: File)

हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन भाषण आयोजित केले जाते. मात्र यंदा ब-याच शाळा बंद असल्यामुळे हा कार्यक्रम होणार नाही. मात्र आपण या मेसेजेसच्या द्वारे एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतो.