तडफदार व्यक्तिमत्व, देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणारी, प्रसंगी आपल्या कुटूंबाला, रुढी-परंपरांना न जुमानता स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपुर्ण भूमिका बजावणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी वाराणसी च्या भदैनी गावात झाला. आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधून इंग्रजांशी दोन हात करत असताना 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाईंचे निधन झाले.‘मेरी झाशी नही दुंगी’ अशी गर्जना करून त्यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. या स्वातंत्र्य युद्धाची ती खरी स्फूर्तीदेवताच ठरली. अशा या थोर क्रांतिकारी वीरांगणेचे करावे तितके कौतुक कमीच आहेच.
आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास Wishes, Messages, Whatsapp Status आणि HD Facebook Image.