होळीच्या दिवशी समिधा पेटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते. त्यानंतर पाच दिवसांनी फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी (Rang Panchami) हा सण साजरा केला जातो. यंदा 2 एप्रिलला हा उत्सव साजरा होणार आहे. रंगपंचमी हा सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा होतो. यादिवशी एकमेकांना रंग लावले जातात, एकमेकांच्या अंगावर रंगाचे पाणी उडवले जाते. साधारण भारतामध्ये हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होतो. रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे. होळीपासून थंडी सरून उन्हाळा सुरु होतो. याच उन्हाची काहिली कमी करण्यासाठी रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर रंगाचे पाणी टाकले जाते.
पूर्वी होळीपासून रंग लावायला सुरुवात होत असे, जो उत्सव पुढील पाच दिवस चाले. रंगपंचमी यातील शेवटचा दिवस. असे म्हणतात द्वापारयुगात भगवान कृष्ण त्यांच्या बालपणी गोपगोपिकांना रंग लावून आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करीत असत. तिच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपात पाळली जात आहे. तर या दिवशी, खास HD Images, Greetings, Wishes, Messages, Facebook, Whatsapp Status शेअर करून रंगमय दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा,
रंग आपुलकीचा, रंग बंधांचा,
रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा,
तुमच्या आमच्या प्रेमाच्या नात्याचा
तुमच्या गोड परिवारास रंगपंचमीच्या शुभेच्छा!
रंगात भिजुनी चिंब होता, रंगाचेही गाणे होते
सच्चेपणा रंगाचा पाहता, उत्साहाला उधाण येते
भेदभाव विसरून येथे, एकतेचे दर्शन घडते
उत्सवप्रिय देशात माझ्य, रंगातूनही हास्य उमलते
रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा!
रंग उधळूदे प्रेमाचे, त्यामध्ये सुखाचा वर्षाव असुदे
रंगाच्या या सणात, तुमचे आमचे नाते कधीही न तुटणाऱ्या धाग्यात रंगूदे
रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा!
रंगात रंगले जीवन, हर्षात फुलले मन
रंगपंचमीच्या रंगांनी रंगली अशी एक शिंपण
हृदयी उरले प्रेम अन मनात नव्या नात्यांची नवी गुंफण
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!
रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठू दे मनीतरंग
तोडून जीवनाचे बंध सारे, असे उधळूया आज हे रंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
दरम्यान, रंगपंचमी हा रंगांचा उत्सव असून, एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याचा हा दिवस. या वेळी वापरण्यात येणारे रंग हे नैसर्गिक आणि सात्त्विक असावेत, असे शास्त्र सांगते. ‘रंगपंचमी’ खेळताना, दुसऱ्याला रंग लावत असताना आपल्या कृतीने समोरची व्यक्ती दुखावेल असे वागू नका. हा आनंदाचा सण आहे तो तसाच साजरा करा.