Rangoli Designs For Ambedkar Jayanti 2023: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उद्या आहे. सध्या बाजारात उत्सवाची तयारी दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात पार पडते. भीम अनुयायी दिवाळीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतात. नवीन कपडे घेतले जातात, घराची सजावट केली जाते, घरात गोड पदार्थ केला जातो, दारासमोर भव्य रांगोळी काढली जाते, दरम्यान, तुमचे काम काहीसे सोपे करण्यासाठी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढता येतील असे काही रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही दारासमोर सुंदर रांगोळी काढू शकता, चला तर मग पाहूया
पाहा व्हिडीओ:
जयंतीसाठी सुंदर रांगोळी डिझाईन
जयंतीसाठी आकर्षक रांगोळी डिझाईन
जयंतीसाठी हटके रांगोळी डिझाईन
जयंतीसाठी सोपी आणि आकर्षक रांगोळी डिझाईन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही व्हिडीओ पाहून सुंदर रांगोळी काढू शकता, दारासमोर सुंदर रांगोळी काढून तुम्ही उत्सवाची शोभा आणखी वाढवू शकता, देशात प्रत्येक भीम अनुयायीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!