Rangoli Designs For Ambedkar Jayanti 2022: डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला काढा 'या' सोप्या रांगोळी डिझाइन, पाहा व्हिडीओ

Ambedkar Jayanti Special Rangoli: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी आहे. डॉ. आंबेडकरांची जयंती ही केवळ जयंती नाही तर उत्सवच आहे. भीम अनुयायी दरवर्षी 14 एप्रिल मोठ्या उत्साहात साजरी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातात.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दीवाळी सारखीच साजरी केली जाते. नविन कपडे परिधान केले जातात. घरी गोड पदार्थ बनवले जातात. दारासमोर रांगोळी काढली जाते. आता कोरोना निर्बंध उठल्यामुळे यावर्षी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा केली जाते आणि दारासमोर भव्य रांगोळी काढली जाते. आम्ही काही सोप्या रांगोळी डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात डॉ. आंबेडकरांची जयंतीला काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिझाईन्स. (हेही वाचा: Dr BR Ambedkar Jayanti 2022: राज्यभरात आजपासून सलग दहा दिवस साजरी होणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती; जाणून घ्या कार्यक्रम)

बाबासाहेब आंबेडकर जयंती रांगोळी डिझाइन 

रांगोळी डिझाइन 

रांगोळी डिझाइन 

रांगोळी डिझाइन 

भीम जयंती रांगोळी डिझाइन