Rang Panchami 2021 Marathi Wishes: होळी हा रंगांचा सण. होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी रंग लावून धुळवड साजरी केली जाते. त्यालाच आपण रंगपंचमी असेही म्हणतो. परंतु, फाल्गुन पंचमी दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. धुलिवंदनापासून सुरु होणाऱ्या वसंत्सोवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. म्हणून त्यास 'रंगपंचमी' म्हणतात. या दिवशी रंग खेळले जातात. पण सध्याच्या धकाधकीच्या आणि घाईगर्दीच्या काळात शहरातील भागांमध्ये धुळवड, रंगपंचमी एकाच दिवशी साजरी केली जाते. उद्या 2 एप्रिल रोजी रंगपंचमीचा सण साजरा होणार आहे. मात्र यंदा कोविड-19 संकटाचे सावट या सणावर आहे. त्यामुळे गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु, सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देऊन तुम्ही रंगोत्सव साजरा करु शकता.
रंगपंचमी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तुमच्यासाठी खास मराठी Messages, Greetings, Images, GIF’s घेऊन आलो आहोत. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर करुन तुम्ही रंगांच्या उत्सवाचा आनंद घेऊ शकता. (Rangpanchami 2021 Messages: रंगपंचमीच्या दिवशी खास मराठी Wishes, HD Images, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे द्या रंगमय दिवसाच्या शुभेच्छा)
रंगपंचमीच्या शुभेच्छा!
भिजू दे रंग अन् अंग स्वछंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उघळूया आज हे रंग…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी दर वर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते
ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा!
रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
GIF's
आपल्या आयुष्यात रंगांचं विशेष महत्त्व आहे. कंटाळलेल्या मनाला, आयुष्याला रंग नवी उमेद देतात. पूर्वी गुलाल, अभीर याने रंगपंचमी साजरी केली जात होती. आता होळीचे विविध रंग बाजारात उपलब्ध आहेत. मात्र रंग खेळताना केमिकलयुक्त, घातक रंगांचा वापर टाळूया आणि नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी साजरी करुया.