रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)

Rang Panchami 2021 Images: फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा रंगपंचमी हा हिंदूंचा एक उत्सव. या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंग उडवून लोक आनंदोत्सव साजरा करीत असल्यामुळे या पंचमीला ‘रंगपंचमी’ हे नाव प्राप्त झाले आहे. या प्रसंगी विविध रंग पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यांमधून एकमेकांच्या अंगावर उडविले जाते. रंग उडविण्याचा उत्सव महाराष्ट्रात फाल्गुन वद्य पंचमीला साजरा केला जात असला, तरी उत्तर भारतात हा सण मात्र होळीच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.

तर ब्रह्मांडामध्ये सात देवतांचे सात उच्च स्तर  असून त्यांच्याशी सात रंग संबंधित आहेत. त्याच प्रकारे मानवाच्या शरीरातही सात चक्र असतात जे या सात देवतांशी संबंधित असतात. रंगपंचमी साजरी करण्यामागचा उद्देश असतो या सात देवतांच्या तत्वरंगाना जागृत करणे. ही तत्वे मानव शरीरात जागृत झाल्याने मानवाचीही आध्यात्मिक साधना पूर्ण होते. तर यंदाच्या रंगपंचमी निमित्त SMS, Messages, Wishes आणि WhatsApp Status च्या माध्यमातून द्या रंगीत शुभेच्छा! (April 2021 Festival Calendar: यंदा एप्रिल महिन्यात गुड फ्रायडे, गुढी पाडवा, राम नवमी ते हनुमान जयंती पहा कोणत्या दिवशी?)

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा (Photo Credits-File Image)

तर यंदा रंगपंचमीचा सण कोरोना व्हायरसमुळे मोठ्या धामधुमीत साजरा करता येणार नाही आहे.  त्यामुळे घरीच थांबून एकमेकांना तुम्ही रंगपंचमीच्या शुभेच्छा वर्च्युअली अगदी अवघ्या काही मिनिटांत आपल्या मित्रमैत्रीणींसह नातेवाईकांना पाठवू शकता. तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या लेटेस्ली मराठी टीमकडून हार्दिक शुभेच्छा!