रमजान मुबारक 2019 (Photo Credits: File Image)

Ramzan Moon Sighting 2019 Mumbai: देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या राजधानी मुंबई (Mumbai) शहरात संपूर्ण देशभराप्रमाणेच रमजान उत्सव सुरु झाला आहे. देशभरातील मुस्लिम बांधवांप्रमाणेच मंबई शहरातील मुस्लिम बांधम चंद्रदर्शन होण्याची वाट पाहा होते. अखेर राज्यातील हिलाल किमिटीला चंद्रदर्शन झाले आणि शहरात रमजान उत्सवाचा जल्लोश सुरु झाला. मुंबईत चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधव आता पहिला रोजा 7 मे म्हणजेच उद्या (मंगळवार) धरतील. आज रात्री धार्मिक विधीनुसार नमाजपटण होईल त्यानंतर रमजान उत्सुव अधिकृतरित्या सुरु होईल.

रमजान सण हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. जगभरात हा उत्सव मोठ्या प्रेमाणे आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. रमजाना काळात 30 दिवस रोजे पाळले जातात. ईदच्या दिवशी हे रोजे पूर्ण होतात आणि रमजान उत्सवाची सांगता होते. रमजान काळ हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत कडक आणि धार्मिक शिस्तीचा म्हणूण ओळखला जातो. या काळात सर्व धार्मिक परंपरा कटाक्षाने पाळल्या जातात. या परंपरा पाळत अल्लाला नमाज अदा केली जाते. (हेही वाचा, Ramadan 2019: आज दिसेल रमजानचा चाँद, उद्यापासून सुरु होतील रोजे; जाणून घ्या या महिन्याचे महत्व)

रमजानचा हा उत्सव पुढील 30 दिवस चालणार आहे.या काळात मुस्लिम बांधव वाईट गोष्टी आणि कृत्यांपासून कटाक्षाने दूर राहतात. मोठ्या प्रेमाणे आणि आदराने अल्लाचे नामस्मरण करतात. इस्लाम धर्मात सांगितलेल्या नियमांनुसार खोटे बोलणे, दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे, बदनामी करणे, स्वार्थ बाळगणे आणि खोटी शपथ घेणे यामुळे रोजा सुटतो असे मुस्लिम धर्माचे अभ्यासक आणि जाणकार सांगतात.