रमा एकादशी 2019 (File Photo)

कार्तिक मासातील एकादशीला रंभा किंवा रमा एकादशी (Rama Ekadashi) म्ह्णून ओळखले जाते, पापक्षालन करण्यासाठी हिंदू धर्मीयांमध्ये या एकादशीचे विशेष महत्व आहे. यंदा हिंदू कालदर्शिकेनुसार, काल म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजून दहा मिनिटांपासून एकादशीची तिथी सुरु झाली असून आज म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजून 19 मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे. यादिवशी विष्णु पूजा केली जाते, काही भागात यादिवशी लक्ष्मीचे पूजन करण्याची देखील पद्धत आहे. श्रीपद्म पुरणात रमा एकादशीचा उल्लेख असून यामागे एक पौराणिक कथा सुद्धा जोडलेली आहे. आजच्या रमा एकादशीच्या निमित्ताने ही कथा आणि एकादशीचा मुहूर्त जाणून घेऊयात..

पुराणानुसार, प्राचीन काली मुचुकुंद नामक एक राजा होता, देवांचे देव इंद्र, कुबेर, वरूण आणि विभीषण हे सर्व त्याचे मित्र होते. यासोबतच विष्णूप्रति मुचुकुंदाला विशेष भक्ती होती. या राजाची कन्या होती चंद्रभागा, जिचा विवाह राजा चंद्रसेनचा पुत्र शोभन याच्याशी झाला होता. एके दिवशी शोभन एकादशीच्या तिथीवर आपल्या सासरी आला होता, योग पाहून त्याने त्या दिवशीच व्रत करण्याचा निर्णय घेतला, मात्र चंद्रभागा शोभन उपाशी काय राहतील या चिंतेने व्याकुळ झाली होती मात्र तरीही राजा मुचुकुंदच्या सक्तीमुळे ती शांत राहिली होती.

दुसरीकडे भूक आणि तहान सहन न झाल्याने शोभन चा मृत्यू झाला, मात्र तरीही चंद्रभागेला मुचुकुंदाने सती जाण्यापासून मनाई केली. या सर्व गोंधळात शोभनला मात्र व्रताचा फायदा झाला, त्याच्या व्रताने खुश होऊन विष्णूने त्याला मंदराचल पर्वतावरील उत्तम देवनागरी देऊ केले तेथे त्याची वैभवात देखरेख केली जाऊ लागली. या साऱ्या प्रसंगामुळे एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रताला अनन्य महत्व प्राप्त झाले आणि परिणामी आजही अनेक घरात ही परंपरा पाळली जाते.

यंदा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला रमा एकादशी चा मुहूर्त आहे.

रमा एकादशी तिथि: 24 ऑक्टोबर 2019

एकादशी तिथि प्रारंभ : 24 ऑक्टोबर 2019 सकाळी 1 वाजून 09 मिनिटे

एकादशी तिथि समाप्‍त: 24 अक्‍टूबर 2019 रात्री 10 वाजून 19 मिनिटे

तिथी दरम्यानचा काळ हा देवपूजनासाठी तसेच अन्य कामांसाठी महत्वाचा आणि शुभ काळ असणार आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही )