भगवान श्रीराम(Shriram) यांचा जन्मदिवस हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील नवमी दिवशी साजरा केला जातो. भगवान विष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांनी जन्म घेतला अशी हिंदूधर्मीयांची धारणा आहे. अयोद्धा नगरी मध्ये जन्माला आलेल्या श्रीरामांचा जन्मदिवस हा चैत्र शुद्ध नवमी दिवशी दुपारी 12 वाजता साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा 2 वर्षांनी कोविड 19 चं संकट शमल्याने भारतात पुन्हा उत्साहाने यंदा रामजन्मोत्सव अर्थात रामनवमी (Ram Navami) मोठ्या साजरी केली जाणार आहे. मग या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना,प्रियजणांना,मित्रमंडळींना देऊन या दिवशाची आनंदमय वातावरणामध्ये सुरूवात करा.
यंदा राम नवमी रविवार, 10 एप्रिल 2022 दिवशी साजरी केली जाणार आहे. राम नवमी निमित्त घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. ठिकठिकाणी राम नवमीचा सोहळा हा राम मंदीर मध्ये साजरा केला जातो. सामुहिक पद्धतीने पाळणा गायला जातो.हे देखील नक्की वाचा: Ram Navami 2022 Bhog List: रामनवमीच्या नैवेद्यासाठी खास मिठाई, व्हिडीओ बघा आणि झटपट बनवा.
राम नवमी शुभेच्छा
राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा,
राम नवमीच्या शुभेच्छा!
ज्यांचा कर्म धर्म आहे
ज्यांची वाणी सत्य आहे
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री राम राम रामेति ।
रमे रामे मनोरमे
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
अनेक लोक या दिवशी भजन आणि कीर्तन आयोजित करतात आणि भगवान रामाच्या जीवनातील कथा सांगून दिवस साजरा करतात. राजा दशरथ आणि राणी कौसल्येच्या पोटी श्री रामाचा जन्म झाला होता.