Ram Navami 2019: रामनवमीसाठी खास भगवान श्रीरामाची गाणी (Video)
Ram Navami (Photo Credits-Facebook)

Rama Navami 2019: चैत्र शुक्लपक्षामध्ये येणाऱ्या नवमी तिथीला रामनवमी (Ram Navami) साजरी केली जाते कारण दिवशी रामाचा जन्म झाला होता. भारतीय संस्कृतीत रामजन्म सोहळा अतिशय महत्वाचा मानला जातो. त्याचसोबत रामनवमी या दिवशी 'श्रीराम जय राम जय जय राम' हा नामजप केल्याने भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

रामनवमीच्या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो. तसेच या दिवशी रामाच्या मंदिरात पूजा, आरती यांचे आयोजन केले जाते. तर काहीजण भगवान श्रीरामाला आठवून त्यांची गाणी आणि भजन ऐकतात. तर रामनवमीसाठी खास भगवान श्रीरामाची गाणी येथे पाहा.(हेही वाचा-Ram Navami 2019: रामनवमी का साजरी करतात?)

तेरे मन में राम

कौसल्येचा राम देव पावला

राम जन्मला गं सखी

रघुपती राघव राजा राम

स्वयं श्री रामप्रभु

राम मंदिरातून चैत्र शुध्द प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत असा नऊ दिवस तर काही ठिकाणी द्वादशीपर्यंत म्हणजे बारा दिवस हा उत्सव साजरा करतात. ह्या दिवशी श्रीरामचरित्र कथा वाचल्या जातात. श्रीरामांना " मर्यादा पुरुषोत्तम " म्हणतात.