Rajmata Jijau Punyatithi 2021 Messages: राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्त मराठी HD Images, Greetings, Status शेअर करुन करा जिजाऊंना प्रणाम!
Rajmata Jijabai Punyatithi 2021 Messages | File Image

Rajmata Jijabai Punyatithi Messages in Marathi: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची 17 जून रोजी पुण्यतिथी. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई आणि वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते. पुढे डिसेंबर 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. त्यांच्या दोन मुलांपैकी थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांजवळ वाढला. तर शिवाजी महाराज आपल्या मातेच्या छत्रछायेखाली मोठे झाले. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1664 साली जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळेस त्या 76 वर्षांच्या होत्या.

राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी HD Images, Wallpapers सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातेला करा कोटी कोटी प्रणाम!

राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त संदेश:

राजमाता जिजाऊ

यांच्या पवित्र स्मृतीस

विनम्र अभिवादन!

Rajmata Jijabai Punyatithi 2021 Messages | File Image

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी

छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम

अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या

राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त

विनम्र अभिवादन!

Rajmata Jijabai Punyatithi 2021 Messages | File Image
Rajmata Jijabai Punyatithi 2021 Messages | File Image

स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ

यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

Rajmata Jijabai Punyatithi 2021 Messages | File Image

तुम्ही नसता तर नसते झाले

शिवराय अन् शंभू छावा

तुमच्या शिवाय नसता मिळाला

आम्हांला स्वराज्याचा ठेवा

जय जिजाऊ!

Rajmata Jijabai Punyatithi 2021 Messages | File Image

केवळ शिवाजी महाराजांचीच नाही तर सईबाई यांच्या अकाली निधनानंतर संभाजीराजांची जबाबदारीही त्यांनी अगदी समर्थपणे सांभाळली. आदर्श माता, राज्यकर्त्या म्हणून जिजाबाईंकडे पाहिले जाते. त्यांचे गुण, धैर्य याचे वर्णन अनेक कथा, कांदबऱ्या, मालिका, सिनेमांतून करण्यात आले आहे. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जिजाऊंना विनम्र अभिवादन!