
Rajmata Jijabai Punyatithi 2021 Images: जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.जिजामाता यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी आली होती. त्यांचा विवाह वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी भोसले यांच्यासोबत झाला होता.जिजाबाईंनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. 1630 मध्ये शिवाजी महाराजांना जन्म दिला. जिजाऊनी शिवरायांना राष्ट्रहितासाठी तयार केलं. जिजाऊ शिवाजी महाराज 14 वर्षांचे होते तेव्हा पुण्यात राहण्यासाठी आल्या होत्या. जिजाऊ या शिवरायांच्या आद्यगुरू होत्या.
शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण सोहळा पाहिल्यानंतर अवघ्या बारा दिवसांतचं इ.स 1674 मध्ये त्यांचे निधन झाले.आज त्यांच्या पुण्यतिथि निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपल्या मित्रपरिवाला हे मराठी HD Images,Whatsapp Status, Messages पाठवा.




