Rajmata Jijau Jayanti 2024 HD Images: राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त Wishes, Messages, Whatsapp Status द्वारा खास शुभेच्छा!
Rajmata Jijau Jayanti 2024 Images (File Image)

Rajmata Jijau Jayanti 2024 HD Images: मराठा सम्राट छत्रपती शिवाजी राजे भोसले (Chhatrapati Shivaji Raje Bhosale) यांच्या मातोश्री जिजाबाई (Jijabai) यांचा जन्म सिंदखेड या गावात झाला. हे ठिकाण सध्या महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जिल्ह्यांतर्गत येते. देशभरात 12 जानेवारी रोजी जिजाऊंची जयंती (Rajmata Jijau Jayanti 2024) साजरी केली जातो. जिजाबाई एक धर्माभिमानी हिंदू होत्या. त्यांनी शिवरायांमध्ये धार्मिक आणि राष्ट्रीय अभिमानाची तीव्र भावना निर्माण केली. त्यांनी त्यांना मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीचे धडे गिरवले. जिजाऊंनी शिवरायांना स्वतंत्र आणि शक्तिशाली मराठा साम्राज्य निर्माण करण्याची कल्पना सांगितली.

जिजाऊंनी शिवाजी महाराजांमध्ये लहानपणापासूनच धैर्य, संस्कृती, नैतिकता आणि देशभक्ती ही मूल्ये रुजवली. शिवाजीकडे दादोजी कोंडदेव नावाचे एक ब्राह्मण शिक्षक होते. त्यांनी शिवरायांना संस्कृत, वेद आणि इतर धार्मिक ग्रंथ शिकवले. शिवरायांच्या जीवनात आई जिजाऊचे स्थान सर्वोच्च आहे. जिजाऊंचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात. जिजाऊंच्या जयंती निमित्त तुम्ही सोशल मीडियावर त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करण्यासाठी खालील Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करू शकता.

Rajmata Jijau Jayanti 2024 Images (File Image)
Rajmata Jijau Jayanti 2024 Images (File Image)
Rajmata Jijau Jayanti 2024 Images (File Image)
Rajmata Jijau Jayanti 2024 Images (File Image)
Rajmata Jijau Jayanti 2024 Images (File Image)
Rajmata Jijau Jayanti 2024 Images (File Image)

जिजाबाईंचे पती शहाजी राजे मरण पावल्यावर त्यांनी सती प्रथेनुसार आत्मत्याग करण्याचा निर्णय घेतला, परंतु शिवाजी महाराजांनी त्यास विरोध केला आणि त्यांना सती जाण्यापासून रोखले. 17 जून 1664 रोजी रायगड किल्ल्याजवळील पाचाड गावात त्यांचा मृत्यू झाला.