Rajmata Jijabai Jayanti Messages (Photo Credits: File Image)

Rajmata Jijabai Jayanti 2020: स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, अखंड मराठी जनमानसाची प्रेरणा, राजमाता जिजाबाई (Rajmata Jijabai) यांची आज, 10 जानेवारी रोजी (तिथीनुसार)  मरणोत्तर 415 वी जयंती आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखुजी जाधव (Lakhuji Jadhav) आणि म्हाळसाबाई (Mhalsabai) यांच्या पोटी पौष पौर्णिमा शके 1520 म्हणजेच 12 जानेवारी 1598 रोजी जिजाबाईंचा जन्म झाला होता. लहानपणापासून कणखर पण तितकाच कनवाळू वृत्तीचा संगम त्यांच्या ठायी होता. हाच स्वभाव पुढे जाऊन त्यांना शहाजी राजें (Shahahi Raje) सोबत संसार करताना, शिवाजी महाराजांना (Chatrapati Shivaji Maharaj)  घडवताना, आणि रयतेला धीर देत राज्यकारभार करताना फायदेशीर ठरला. .आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना श्रद्धांजली वाहणारे हे काही संदेश आम्ही आपल्याला देत आहोत. आपल्या Instagram, Facebook, Twitter सहित अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण हे संदेश फ्री डाउनलोड करून शेअर करू शकता.

राजमाता जिजाबाई जयंती निमित्त खास मराठी संदेशपत्र

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरील 'छत्र',

राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतीस जयंती निमित्त त्रिवार अभिवादन

Rajmata Jijabai Jayanti Messages (Photo Credits: File Image)

आदर्श पत्नी, आई आणि प्रशासक

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी

त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली

Rajmata Jijabai Jayanti Messages (Photo Credits: File Image)

राजमाता जिजाबाई यांना जयंती निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली

Rajmata Jijabai Jayanti Messages (Photo Credits: File Image)

जिजाऊ जयंती 2020

Rajmata Jijabai Jayanti Messages (Photo Credits: File Image)

धन्य तो शिवबा! धन्य ती जिजामाता

राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Rajmata Jijabai Jayanti Messages (Photo Credits: File Image)

आज 21 व्या शतकामध्ये स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी सुरु असलेली धडपड पाहता जिजाऊ यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व किंबहुना त्यांच्यातील काही गुण जरी प्रत्येक स्त्रीने अंगिकारले तरी मोठा बदल दिसून येईल. स्वाभिमानी, कणखर, मायाळू , दृढनिश्चयी अशा या आदर्श 'स्त्री' म्हणजेच राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त लेटेस्टली परिवाराकडून विनम्र अभिवादन!