Promise Day 2021 Gift Ideas (PC - File Image)

Promise Day 2021 Gift Ideas: व्हॅलेंटाईन आठवड्यात 'प्रॉमिस डे' हा सर्वात महत्वाचा दिवस आहे. या दिवशी सर्वजण आपल्या जोडीदाराला आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन देतात. या व्हॅलेंटाईन डेच्या तीन दिवसा आधी म्हणजेचं 11 फेब्रुवारी रोजी 'प्रॉमिस डे' साजरा केला जातो. 'प्रॉमिस डे' निमित्त तुम्ही आपल्या जोडीदारास किंवा आपल्यास आवडत्या व्यक्तीस वचन देऊन खास गिफ्ट देऊ शकता. या दिवशी आपण व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवरून मेसेज करण्याव्यतिरिक्त आपल्या जोडीदाराला दुसर्‍या मार्गाने आनंदित करू शकता. या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदाराला खास भेटवस्तू देऊ शकता. भेटवस्तू देण्यासाठी तुम्ही बाजारात न जाता, घरी हाताने खास गिफ्ट तयार करू शकता. आज आपण या लेखातून प्रॉमिस डे निमित्त आपल्या जोडीदाराला कोणतं गिफ्ट देऊ शकता. याबद्दल काही गिफ्ट आईडिया जाणून घेऊयात.

हँड इम्प्रेशन -

प्रॉमिस डे निमित्त तुम्ही आपल्या जोडीदाराला हँड इम्प्रेशन गिफ्ट म्हणून देऊ शकता. आपण हे घरी सहजपणे तयार करू शकता. यासाठी तुम्ही बाजारातून किंवा ऑनलाईन हँड प्लास्टर स्टॅच्यू मोल्डिंग आणि कॉस्टिंग किट मिळवू शकता. ज्यामध्ये प्लास्टिक मोल्डिंग बादली येईल. ज्यात मोल्डिंग पावडरची एक पिशवी, प्लास्टर कास्टिंग स्टोनची 1 पिशवी, बारीक सॅंडपेपर, डिमल्डिंग स्टिक या सर्व गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी एकत्र करा. त्यात आपले दोन्ही हात धरा आणि काही सेकंदांनंतर ते काढा. यात संपूर्ण प्रक्रिया लिहिलेली असते. त्याचे अनुसरण करा आणि आपली अनोखी भेट आपल्या जोडीदाराला द्या. (वाचा - Propose Day 2021 Gift Ideas: 'प्रपोज डे' निमित्त तुमच्या पार्टनरला आपल्या मनातील गोष्ट सांगत खुश करण्यासाठी 'या' आयडियाज येतील कामी)

हँड इम्प्रेशन (PC -pxhere)

पेंडेंट -

वचन दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या प्रियकरासाठी एक सुंदर पेंडेंट भेट देऊ शकता. ही भेटवस्तू तुमच्या जोदीराच्या आयुष्यभर सोबत राहू शकते. आपण काहीही न बोलता या भेटवस्तूमधून तुम्ही बरेचं काही व्यक्त करू शकता.

पेंडेंट (Pc -pixabay)

रिंग -

प्लॅटिनम किंवा सोन्याच्या अंगठीवर प्रेमाचं प्रतीक बनवा आणि आपल्या जोडीदारास भेट द्या. असं करून तुम्ही आपल्या जोडीदाराला कायम एकत्र राहण्याचे वचन देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही त्या रिंगवर स्वत:चं आणि आपल्या प्रियकराचं नाव टाकू शकता.

Ring (PC - Pixabay)

लव नोट्स -

आपल्या जोडीदाराला तुम्ही खासा लव नोट्स भेटवस्तू म्हणून देऊ शकता. यामध्ये आपल्या भावना, संस्मरणीय क्षण तसेच भविष्यातील योजनांबद्दल लिहा.

छोटा स्टेच्यू -

गिफ्ट कपल स्टेच्यूची कल्पनाही प्रॉमिस डे निमित्ताने सर्वोत्कृष्ट ठरू शकते. आपली भावना आणि प्रेम दर्शविण्यासाठी असे स्टेच्यू बाजारात उपलब्ध आहेत.

गिफ्ट बॉक्स -

या बॉक्समध्ये चॉकलेट, टेडी आणि फूल न ठेवता, जुन्या लव नोट्स ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींचा संग्रह बनवा जो आपल्याला तुमच्या दोघांमध्ये संस्मरणीय क्षणांची आठवण करुन देईल. हे अनोख गिफ्ट पाहून तुमचा जोडीदार नक्कीच आश्चर्यचकित होईल.