Shiv Jayanti 2021: छत्रपती शिवाजी महाराज यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नमन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी गडावर साजरा केला शिवजन्मोत्सव
Chhatrapati Shivaji Maharaj | (Photo Credits: Twitter/ @narendramodi)

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज जयंती. शिवजयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2021) महाराष्ट्र आणि देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवप्रतिमा आणि पुतळ्यांना अभिवादन केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह अनेकांनी छत्रपतींना अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन छत्रपतींना अभिवादन केले आहे. तर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुणे येथील शिवनेरी गडावर (Shivneri Fort) जाऊन शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'भारतमादेचे अमर सुपूत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त शत-शत नमन. त्यांचे साहस आणि अद्भुत शौर्य, असाधाण बुद्धीमत्ता यांची गाथा देशवासियांमध्ये युगानुयुगे प्रेरणा देत राहील. जय शिवाजी!' (हेही वाचा, Shiv Jayanti 2021 HD Images: शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठी Wishes, Messages, WhatsApp Status, Images शेअर करून द्या या खास दिवसाच्या शुभेच्छा)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी गडावर जाऊन शिवजन्मोस्तव सोहळा साजरा केला. या वेळी शिवाजी महाराज यांचा पाळणा म्हणण्यात आला. या पाळण्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाळण्याची दोरी ओढली.

दरम्यान, शिवजन्मोत्सव सोहळा शिवनेरी गडावर पार पडल्यानंतर या ठिकाणी पुढील कार्यक्रम सुरु आहेत. शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरु आहे. याशिवाय इतरही काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंतीच्या तारखेबाबत अनेक वाद विवाद असले तरी, महाराष्ट्र सरकारने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जन्मतारीख मानली. सन 2001 मध्ये त्याबाबत निर्णय झाला. तेव्हापासून 19 फेब्रुवारी या दिवशीच शासकीय शिवजयंती साजरी होते.