Pratapgad Fort: 'जय भवानी जय शिवाजी' जयघोषांसह, 361 मशालींनी उजळला किल्ले प्रतापगड (Video)
Pratapgad Mashal Mahotsav 2021 | (Pic Credit - You Tube)

'जय भवानी जय शिवाजी' (Jai Bhawani Jai Shivaji) हा जयघोष आणि 361 मशाली यांनी किल्ले प्रतापगड ( Pratapgad Mashal Mahotsav 2021) उजळून निघाला. प्रतापगडावर (Pratapgad) मशाल महोत्सव (Mashal Mahotsav) हा शिवभक्तांसाठी पर्वणी असते. त्यामुळे शिवभक्त प्रतिवर्ष मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास 361 वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधत नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर दाखल झाले. प्रतापगड, महाबळेश्वर,सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली आदी परिसरातून दाखल झालेल्या शिवभक्तांनी प्रतापगडावर मशाली पेटवल्या.

प्रतापगडावर साजऱ्या होणाऱ्या मशाल महोत्सवाची तयारी नवरात्री पूर्वी पंधरा दिवस आधीपासून सुरु होते. या महोत्सवासाठी शेकडो लोक कार्यरत होतात. आपापल्या परीने महोत्सवाच्या कार्यात हातभार लावतात. त्यासाठी मशाली आणि लागणारे इतर साहित्यही पुरवले जाते. प्रतापगडाच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई केली जाते. भवानी माता मंदिर ते बरुज यादरम्यान मशाली पेटवल्या जातात. ज्यामुळे अवघा गड उजळून निघतो. (हेही वाचा, 10 नोव्हेंबर हा दिवस 'शिवप्रताप दिन' म्हणून का साजरा केला जातो?)

व्हिडिओ

भवानी मातेची विधवत पूजा, गोंधळ आदी कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ढोल ताशांचा गजर करत मशाल महोत्सव सुरु होतो. ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणा देत शिवभक्त गडांच्या तटभींती आणि परिसरात मशाल पेटूवून निघतात. या वेळी सर्व परिसर उजळून निघतो. महोत्सवानिमित्त गडावर मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाहीसुद्धा केली जाते. परंतू, यंदा या महोत्सवावर कोरोनाची छाया दाटल्याने नेहमीसारखा उत्साह पाहायला मिळाला नाही, असे शिवभक्त सांगतात.