Lord Vishnu (Photo credits: Facebook)

Paush Putrada Ekadashi 2020: हिंदू वर्षातील दुसरी पुत्रदा एकादशी  (Putrada Ekadashi) यंदा पंचांगानुसार आज, 6 जानेवारी रोजी आहे. इंग्रजी वर्षानुसार हा जानेवारी 2020 महिन्यातील पहिला खास दिवस असणार आहे. मूल प्राप्ती व्हावी या हेतूने भगवान विष्णूचे पूजन करत ही एकादशी साजरी केली जाते. जे दाम्पत्य या दिवशी मनोभावे विष्णूचे (Lord Vishnu) पूजन करतात त्यांना पुत्रप्राप्तीचा प्रयत्नात यश येते असे पुराणात सांगितले गेले आहे. या पूजेची विधी अत्यंत साधी सोप्पी आहे, आज जर का तुम्ही हे व्रत पाळणार असाल तर त्याआधी पूजेचा मुहूर्त विधी आणि या एकादशीच्या मागील खरी कथा जाणून घ्या... चला तर मग पाहुयात का आहे पौष पुत्रदा एकादशी खास आणि कसे कराल विष्णू पूजन.. Shakambari Navratri 2020 Wishes and Images: शाकंभरी नवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers शेअर करुन द्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा!

पौष पुत्रदा एकादशी व्रत मुहूर्त

एकादशी तिथि सुरुवात : 6 जानेवारी 2020 सकाळी 3 वाजून 6 मिनिटे ते

एकादशी तिथि समाप्ती : 7 जानेवारी 2020 सकाळी 4 वाजून 2 मिनिटांपर्यंत

पौष पुत्रदा एकादशी व्रत विधी आणि नियम

सकाळी लवकर उठून भगवान विष्णू, लक्ष्मी समोर दिवा लावून धुप करावा. यादिवशी श्रीकृष्णाची पूजा देखील केली जाते. सहपरिवार आरती करावी. एका दिवसाचा उपवास करताना फलाहार करता येतो, मात्र लसूण आणि कांदे विरहित जेवण करावे तसेच 24 तासासाठी ब्रह्मचर्य पालन करावे. व्रत तोडण्याआधी गरिबांना व मुक्या प्राण्यांना अन्नदान करावे. या दिवशी देवाकडे आपण केलेल्या चुकीची क्षमा मागायची असते तसेच नकळत घडलेल्या गुन्ह्यांसाठी सुद्धा क्षमायाचना कराची संधी असते.

पौराणिक कथा

भद्रावती नगरात सुकेतुमान नामक एक राजा होता, त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते. या दाम्पत्याला लग्नानंतर बरेच वर्ष संतान प्राप्ती होत नव्हती कित्येक ब्राह्मणहभोज करून पूजा अर्चना करुनही उपयोग होत नसल्याने दोघेही चिंतीत होते, पुत्र न झाल्यास राजाचे आणि त्याच्या पूर्वजांचे पिंडदान करण्यासाठी कोणीही वारस नव्हता ज्यामुळे कोणालाही मुक्ती मिळणे शक्य नव्हते.

याच विचारात असताना एके दिवशी राजाला रस्त्यात एक आश्रम दिसला. राजाने या आश्रमातील ऋषी मुनींना दंडवत केले, त्याची नम्रता पाहून आनंदी झालेल्या ऋषींनी त्याला वरदान मागण्यास सांगितले. राजाने त्यांना आपल्या समस्येविषयी सांगितले असता त्यांनी पुत्रदा एकादशी विषयी माहिती दिली. इतकेच नव्हे तर, या ऋषींनी राजाकडून व्रत करूनही घेतले, दुसऱ्या दिवशी विधिवत उपवास सोडून व्रत पूर्ण केल्यावर काहीच दिवसात राजगृही आनंदाची बातमी आली. व राजा राणीला पुत्र लाभ झाला.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे. लेटेस्टली मराठी यामार्फत कोणतीही अंधश्रद्धा पसरावी इच्छित नाही.)